विश्वकर्मा समाजाकरीता इकॉमर्स (अमॅझोन, फ्लीपकार्ट प्रमाणे) योजना तयार केलेली आहे. यात विश्वकर्मा समाजातील लहान मोठे सर्व व्यवसाय जोडायचे आहेत. यात मॅनुफॅक्चरर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर, सर्व्हिस प्रोव्हायडर, लघु उद्योग, असे अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे आहेत त्यांना समाविष्ट करायचे आहे.समाज बांधव कुठूनही यातील उत्पादन खेरदी करु शकतील त्यांना ती वस्तू घरपोच मिळेल. त्यांना ती कॅश ऑन डिलीव्हरी सुद्धा मिळू शकेल. उदा. नागपूर येथील आपल्या समाजातील व्यवसायीकाचे टिव्हीचे दुकान आहे त्याच्याकडील टिव्हीची माहिती ईकॉमर्स मध्ये टाकलेली असेल. त्यातील एक टिव्ही आपल्या समाजील नाशिक मध्ये राहणा-या व्यक्तिस खरेदी करावयाचा असल्यास तो ईकॉमर्स मधून खरेदी करेल. डिलीव्हरी करणारी कंपनी नागपूर मधील विक्रेत्याकडून टिव्ही प्राप्त करेल आणि तो नाशिक येथील टिव्ही बुक करणा-या समाज बांधवाच्या घरी पोहोचवेल. अश्या प्रकारे आपण आपल्या समाजाचा व्यवसाय इकॉमर्सच्या माध्यमातून दूरपर्यंत वाढू शकतो..
गृहउद्योग योजना
या योजनेप्रमाणे आपण आपल्या समाजातील ग्रामिण असो किंवा शहरी असो त्यांना गृह उद्योग किंवा लघु उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन करायचे आहे.
यात रोजच्या वापरात येणा-या वस्तूंचे उत्पादन करण्याबाबत माहिती द्यायची आहे. त्यांना उदा. पापड, लोणचे, तिखट, हळद, क्लिनींग पावडर, फिनाईल,
दिवाळीतील सजावतीचे साहित्य, इत्यादी वस्तूंचे उत्पादन घरुनच करावयास लावणे. हि सर्व उत्पादने विश्वकर्मा उद्योग नावाने बाजारात किंवा ईकॉमर्समध्ये आणायचे.
यामुळे आपल्या समाजातील व्यक्ति ते खरेदी करतील. यामुळे त्यांना उच्च दर्जाचे उत्पादन मिळेल. भेसळ उत्पादनापासून सुरक्षा होईल.
अनेक समाजबांधवांना रोजगार किंवा व्यवसायाचे माध्यम मिळेल, उत्पन्नाचे साधन निर्माण
होईल..